top of page

IPL खेळ की अजून काही?

Updated: Apr 19

आयसीसी ची चॅम्पियन ट्रॉफी संपल्यानंतर पुढील काही दिवसातच भारतात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL लवकरच सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा क्रिकेटचा सर्वात मोठा आणि श्रीमंत लीग मानला जातो. क्रिकेट हा भारतातील एकमेव धर्म मानला जात असला, तरी IPL म्हणजे क्रिकेटपेक्षा जास्त करमणुकीचा तमाशा झाला आहे. खेळाडूंची बोली लावणे, मोठमोठे जाहिरातदार, ग्लॅमरचा भरपूर मारा, आणि पैशांचा पाऊस यामुळे हा स्पर्धा एका व्यावसायिक यंत्रणेत रूपांतरित झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बीसीसीआय कडून क्रिकेट चे या तमाशाचे आयोजन केले जाते.


एकेकाळी कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय सामने क्रिकेटची खरी प्रतिष्ठा राखून होते. पण IPL मुळे क्रिकेटचा आत्माच हरवल्यासारखा वाटतो. संघांच्या मालकी हक्कांपासून खेळाडूंच्या खरेदी-विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट पैशांवर अवलंबून असते. खेळातील कौशल्य आणि संघभावना यापेक्षा प्रसिद्धी आणि ब्रँड व्हॅल्यू याला अधिक महत्त्व दिले जात आहे.


IPL म्हणजे केवळ क्रिकेट नसून त्यामागे मोठा आर्थिक व्यवहार चालतो. कोट्यवधी रुपयांची बेटिंग, सट्टेबाजी, आणि स्पॉट फिक्सिंगचे आरोप अनेकदा IPL वर झाले आहेत. काही खेळाडूंच्या आणि मालकांच्या गैरव्यवहारांचे प्रकरणे उघडकीस आली आहेत.


IPL मुळे काही नवोदित खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी मिळते, हे खरे असले तरी या स्पर्धेने क्रिकेटच्या मूळ भावनेलाच हरवले आहे. सगळीकडे फक्त मनोरंजन, जाहिराती आणि ग्लॅमरचा बोलबाला आहे. त्यामुळे क्रिकेट हा एक निखळ खेळ राहिला नसून तो "तमाशा" बनला आहे.


IPL मुळे क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे. हा बदल सकारात्मक आहे की नकारात्मक, हे वेळच ठरवेल. पण क्रिकेटच्या चाहत्यांनी विचार करायला हवा— आपण क्रिकेट बघतो की एक भव्य करमणुकीचा तमाशा?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page