top of page


राजकारणाचा क्रॅश कोर्स
प्रिय नातू, नुकताच तू जन्माला आलास आणि तुला दवाखान्यातून घरी नेण्यासाठी मी १२ कोटीची गाडी विकत घेतली. आता त्या गाडीच्या मागच्या काचेवर मी अमुक अमुक जातीचा कामगार नेता असं लिहून घेणार आहे. म्हणजे कसं त्या जातीची लोकही खुश आणि कामगारही खुश. तसं म्हटलं तर माझे आजोबा कामगार होते, मी राजकारणाच्या जीवावर बिजनेसमन झालो आहे पण सहनभूती आणि मत मिळवायची म्हणजे स्वतःला गरीब म्हणवून घ्यावं लागतं. ह्याच आलिशान गाडीत बसून मी जेवण करतानाचे विडिओ बनवून व्हयरल करेल, कामात फार व्यस्त असल्याचा आ
3 min read


व्यक्ती आणि वल्ली- पु ल देशपांडे (Vyakti Ani Valli)
आपल्याला आयुष्यात अनेक माणसे भेटतात, म्हणजे अगदी प्रवासात अनोळखी माणसासोबत झालेली भेट असो किंवा आयुष्याच्या प्रवासात साथ देणारी व्यक्ती असो. पु ल देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकात ही व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. आपल्याला आयुष्यातील भेटलेल्या माणसांचे स्वभाव गुण विचारले तर वाईट गुण जेवढ्या लगेच सांगू शकतो तेवढे चांगले गुण सांगणे थोडे कठीण जाईल. या पुस्तकातून प्रत्येक माणसाच्या स्वभावाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी निर्माण होते. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना
1 min read


अस्तित्व- भेटलेली माणसे
एवढ्या गजबजलेल्या शहरात ह्या रिकाम्या राहिलेल्या जमिनीवर काँक्रिटचे ठोकळे रचले जाणार होते, त्या घरांमध्ये अनेक लोकं त्यांची स्वप्न घेऊन...
3 min read


मी आणि पैसा
माझी आणि पैशाची दोस्ती कधीच झाली नाही. इथे माझा खिसा नेहमीच रिकामा राहिला, नव्हे मीच माझ्या खिशाला कात्री लावली असे म्हटले तरी ते चुकीचे नाही. सर्वसामान्य घरातील, साधारण पगारावर काम करणारा मी. पहिल्यांदा नोकरीला लागल्यावर एक मित्र भेटला, तो म्हणाला अरे काय आयुष्यभर नोकरी करणार का. त्यापेक्षा शेअर मार्केट मध्ये पैसे टाक, दिवसाला पाचशे रुपये मिळतील. ज्याला दिवसभर राबून तीनशे रुपये मिळतात तो माझ्यासारखा अशा स्वप्नांना लगेच मिठीत घेतो. पूर्वी निर्देशांक घसरले का वधरले असली माहिती
3 min read


कत्तली
झाडांच्या कत्तली करायच्या आणि वरून यंदा उन्हाळा जरा जास्त जाणवतोय यावर चर्चा करायची. दर उन्हाळ्यात फोटो फिरतात, की कोणीतरी चौकात...
2 min read
bottom of page