top of page

व्यक्ती आणि वल्ली- पु ल देशपांडे (Vyakti Ani Valli)

आपल्याला आयुष्यात अनेक माणसे भेटतात, म्हणजे अगदी प्रवासात अनोळखी माणसासोबत झालेली भेट असो किंवा आयुष्याच्या प्रवासात साथ देणारी व्यक्ती असो. पु ल देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकात ही व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. आपल्याला आयुष्यातील भेटलेल्या माणसांचे स्वभाव गुण विचारले तर वाईट गुण जेवढ्या लगेच सांगू शकतो तेवढे चांगले गुण सांगणे थोडे कठीण जाईल. 


या पुस्तकातून प्रत्येक माणसाच्या स्वभावाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी निर्माण होते. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना तो प्रसंग, त्यातील व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा वाचून आपल्याही आयुष्यात अशाच स्वभावाची माणसं आहेत, फक्त आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकतर्फी आहे याची जाणीव होते. रोजच्या जीवनात माणूस आधीच वैतागलेला असतो, त्याला अजून उपदेश, नकारात्मकता नको असते, त्याला हवं असतं निखळ हास्य, आणि हे पुस्तक तुम्ही तीच अपेक्षा पूर्ण करते. मी या पुस्तकाचे एखाद्या धार्मिक ग्रंथाप्रमाणे अक्षरशः पारायण केले आहेत असे म्हणता येईल. या पुस्तकातील काही व्यक्तिचित्रांचे पुलंच्या आवाजात कथाकथन यूट्यूबवर उपलब्ध आहेत.


पुण्यात सोसायटीतील काही मुलांना ‘पु. ल. देशपांडे’ हे नाव ऐकलं आहे का, असं विचारलं असता काही मुलांनी उत्तर दिलं—“हो, ते सिंहगड रोडला गार्डन आहे ना?” हे ऐकून जाणवतं की पु. ल. यांचं लिखाण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे. त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक घरात असायलाच हवं.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page