top of page

मी

Updated: Mar 20

मी माझ्या आयुष्याच्या मध्यभागी उभा आहे. आजपर्यंत जितके वर्ष जगलो तितके वर्ष अजून जगण्याची संधी देव मला देईल असे वाटते. पण इतक्या वर्षात मला नक्की काय साध्य करायचे आहे ते काही अजूनपर्यंत कळलं नाही. माझी स्वप्न काळानुसार बदलत गेली. लहानपणी कोणी विचारलं की काय बनणार तेव्हा मी काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचो. आता नोकरीसाठी मुलाखतीमध्ये मी स्थापत्य अभियंता का झालो याचं कृत्रिम उत्तर मी फार रंगवून सांगतो. तसं तर परीक्षेतील गुण माझ्यावर नाराज असल्यामुळे इतर शाखेत प्रवेश मिळाला नाही म्हणून मी हा दुसरा मार्ग निवडला होता. अजूनही एखादा चित्रपट पाहिला की त्यातील नायकासारखं आपणही काहीतरी बनावं असं मला वाटत. रोज टपरीवर माझ्यासारखेच नोकरीला कंटाळलेल्या मित्रांसोबत चहा प्यायला गेलो की हा चहावाला रोज किती पैसे कमवत असेल याचा हिशोब करतो, आपणही असाच काहीतरी उद्योग करून भरपूर पैसे कमवावे असं वाटतं. आणि थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे नोकरदारांच्या घोळक्याचा एक भाग होऊन ऑफिसकडे जायला निघतो. माझ्यातल्या आळशीपणाच्या राक्षसाला आयुष्यातील किती वेळ मी दान म्हणून दिला त्याचा हिशोब न मांडलेला बरा. एक ना एक दिवस सगळी स्वप्न पूर्ण करू या आशेवर जगण्याची वाटचाल सुरू राहणे महत्त्वाचे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page