top of page

प्रदेश, जात, पक्ष, भाषा, इतिहास, संस्कृती मोठी? की पैसा मोठा?

Updated: Apr 19

वरील प्रश्नच तुमचं उत्तर पैसा सोडून इतर असेल तर तुम्ही संत आहेत असं समजा आणि पुढे वाचू नका. पण पैसा मोठा असा थोडा जरी मनात विचार आला असेल तर तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव आहे हे नक्की.

   आम्ही तसे खूप हळवे, भावनिक लोक आहोत. आमच्या भावना भडकवायला मशालीची गरज नसून एक ठिणगीही पुरते. आणि ती ठिणगी कशी निर्माण करायची याचे कौशल्य काही लोकांना चांगलेच उमगले आहे. ती पेटलेली आग कायमस्वरूपी धगधगत ठेवण्यासाठी आवश्यक ते इंधन सोशल मीडिया पुरवते.

   इतिहासातील घटना वा व्यक्ती यांच्याकडून आपण कसे वागावे किंवा वागू नये एवढेच शिकायचे असते. कारण ज्या त्या वेळची परिस्थिती वेगवेगळी असते. सध्याच्या काळात त्या घटनांचे दाखले देऊन कोणला कमी लेखणे किंवा स्वतःला भारी समजणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण.

    एखादा प्रदेश, भाषा, व्यक्तीचे विचार, संस्कृती याबाबात नुसताच अभिमान बाळगून काय साध्य होणार. अभिमान बाळगणाऱ्या त्या गोष्टीमध्ये आपण काही भर घालतो का? काळानुसार त्यात काही बदल करण्यासाठी प्रयत्न करतो का? की त्या अभिमानाचा फक्त इतर गोष्टी कमी लेखण्यासाठी सोयीनुसार वापर करून घेतो?

    नक्की प्रमाण सांगता येणार नाही, पण हे नक्की की संपत्ती वरून आपले सगळ्यात जास्त वाद भावकी बरोबर असतात. मग अशा वेळी आपल्याला का नाही आठवत ज्याचा आपण गर्व करतो त्या जातीचे, आपलीच भाषा बोलणारे, आपल्याच प्रदेशात राहणारे हेच आहेत. त्यामुळे सरसकट चांगुलपणाचे किंवा वाईटपणाचे शिक्के एका गटाच्या कपाळावर मारणे चुकीचे आहे.

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page