top of page

लवचिक स्वाभिमान

Updated: Mar 20, 2025

सरकारी कामाचा माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या फायद्याचा अनुभव सांगतो. दोन दिवसांपूर्वी माझी पाठीला कडकपणा आला होता, मला खाली वाकता येत नव्हते. मी एका डॉक्टरला दाखवले तर त्यांनी काही लाखांची शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले.

पण माझ्या एका मित्राने मला सल्ला दिला की गावात नव्याने बनलेल्या रस्त्यावरून दुचाकीवर ४ फेऱ्या मार. आणि विशेष म्हणजे तिथे नव्याने झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांवरून गाडीवर फेऱ्या मारताना माझ्या मणक्याची हाडे दोनच फेऱ्यात मोकळी झाली. मी भरलेल्या प्रप्तिकरातून तयार झालेल्या रस्त्याने अप्रत्यक्ष रित्या माझे आजारपण घालवले.

आता माझ्या स्वाभिमानाप्रमाणे माझ्या पाठीचा कणा सुद्धा लवचिक झाला आहे

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page