top of page

वजन वाढ

Updated: Mar 20

कोणी खायला देत नाही का?, व्यायाम करत जा, सारखं खात राहायचं… हे आणि ह्याच प्रकारचे अनेक सल्ले माझ्या वजन वाढीसाठी लोकं सतत ऐकवत असतात. पण फुगलेल्या देहाचा आकार कमी करण्यासाठी सकाळी पळापळ करणाऱ्या लोकांकडे बघून वाटते आपला BMI कमी आहे तेच बरे. किती ग्राम काय खाल्ल्यावर किती किलो वजनात फरक पडेल ह्याचा हिशोब लावत बसावे लागत नाही, सगळं कसं बिनधास्त खाऊ शकतो. स्वप्नात दिसणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात जवळून जात असेल तेव्हा कलिंगडसारखी वाढलेली ढेरी बाकी लोकांसारखी आत ओढून धारावी लागत नाही. आयुष्याच्या शेवटी जेव्हा मिरवणूक निघेल तेव्हा चार माणसे सहज उचलून घेतील.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page