top of page

बाललीला

Updated: Mar 20

माझ्या ओळखीचे गावात एक वयस्कर कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचे आता वय जास्त झाल्यामुळे गावात कुठे जाणे ते शक्यतो टाळतात आणि घरातील माणसे त्यांच्या विविध बाललीला मुळे वैतागतात. घर रस्त्यालगत असल्यामुळे घराबाहेरील कट्ट्यावर दिवसभर बसून त्यांची चांगलीच करमणूक होते, नव्हे ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची टिंगल करून स्वतःची करमणूक करून घेतात. खर तर त्यांनी फक्त आपल्या नातवंडांना सांभाळणे एवढे जरी काम केले तरी त्यांच्या कुटुंबातील माणसे उपकाराखाली राहतील. पण त्यांच्या बाबतीत वयाबरोबर खोडकरपणा अधिक मुरत गेला असावा कारण त्यांची नातवंडे त्यांच्यापेक्षा अधिक समंजस वाटतात. करोना काळात कितीही पैसे देऊन न मिळणारी तंबाखू त्यांच्याकडे किलोच्या मापात होती त्यामुळे तेलाच्या खाणींचे मालक असल्यासारखे ते सर्वांना आपल्याकडच्या साठ्याबद्दल सांगत होते. तंबाखूची पुडी सोडताना आठवणींच्या पण पुड्या सोडत असतात. जसे चित्रपटातील काही दृश्याना भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत तसे यांचे किस्से आणि तर्कशास्त्र याची सांगड घालून ऐकू नयेत. अशा माणसाच्या आयुष्यात निराशा, दुःख असल्या गोष्टी त्यांच्या पंगतीला कधीच बसल्या नाहीत. उद्याची चिंता नाही कि भूतकाळाबाबत पश्चताप वा समाधान नाही.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page