top of page

सार्वजनिक सणांवर झालेले राजकीय अतिक्रमण.

Updated: Apr 19

  हल्ली सार्वजनिक सण साजरे करण्यापेक्षा त्यांना सोहळ्याचे स्वरूप देऊन अधिक भव्यपणे करण्यावर जास्त जोर दिला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे अशा कार्यक्रमांमध्ये झालेले राजकीय अतिक्रमण. सर्वच राजकीय पक्षांना हे चांगल्या प्रकारे हे कळले आहे की अशा कार्यक्रमांना इतर राजकीय सभांसारखी पैसे देऊन गर्दी गोळा करावी लागत नाही, लोक इथे जमा होतातच. मग भव्यतेच्या नावाखाली डीजेचा दणदणाट, लेझर लाइट्स आणि त्याचे दुष्परिणाम आता नव्याने सांगायची गरज नाही. 

  आजकाल काही राजकीय पक्षाचे नेते दहीहंडीला लावणीचे कार्यक्रम ठेवतात, बरं ती लोककला म्हणून सादर करणाऱ्या सामान्य कलाकारांना न बोलवता अश्लील नृत्य करणाऱ्या कोणत्यातरी प्रसिद्ध व्यक्तीला बोलावले जाते. याचा सरळ अर्थ असा की यांना कलेशी घेणेदेणे नसून गर्दी गोळा करून आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढंच उद्देश असतो. जवळपास सर्वच छोटे छोटे सण समारंभ पण हायजॅक केले आहेत. नशीब अजून कुठुनतरी नाग धरून आणून सार्वजनिक नागपंचमी साजरी करण्याची सोय राजकीय नेते उपलब्द करून देत नाहीत. सर्वत्र सणाच्या शुभेच्या देण्यासाठी लागलेले फ्लेक्स यांचा Visual Pollution मध्ये मुख्य हात आहे. 

  जोपर्यंत सार्वजनिक सण समारंभात सर्वांनी एकत्र येणे, धर्मातील गोष्टी पुढच्या पिढीला देणे, जनजागृती करणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे उद्देश नसतील तर ते सण साजरे करण्याला अर्थ उरत नाही. जोपर्यंत सजावट, भजन, पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा गोष्टी स्वतः करत नाही तोपर्यंत साधेपणातही आनंद असतो हे कळणार नाही.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page