top of page

आगळीवेगळी होळी

Updated: Apr 19

रंग तर आम्ही रोजच उडवतो.... तुम्हाला माहिती आहे का आमची अनोखी होळी...


आम्ही लोक कधी सरकारने आमच्या खायच्या आवडत्या वास्तूवर कर वाढवला म्हणून होळीला मारतात तशी सरकारच्या नावाने बोंब मारत नाही. आम्ही खरे कलाकार आहोत. आम्ही पान मसाला, गुटखा हे पदार्थ खाऊन ‘सार्वजनिक’ अशा ज्या काही वास्तू आहेत तिथे तोंडातल्या पिचकारीने कला साकारतो.

एवढी नव्या नवरी सारखी नटून आमच्या शहरात आलेली मेट्रो सुद्धा आम्ही सोडली नाही, तिथेही थुंकलो आम्ही. कसलीही लाज न बाळगता आमचे हे कार्य अविरत चालू असते. अशा पदार्थांवर ‘रंग-रंगोटी कर’ आकारला पाहिजे.

खर तर आपला राष्ट्रीय रंग तांबडा (रंगाचे ज्ञान कमी असल्याने दुरुस्ती करावी) घोषित करून सर्वत्र तो रंग द्यावा. म्हणजे सर्वत्र दिसणारे ओंगळवाणे दृश्य कमी होईल. असो, थुंकलेल्या भिंती रंगवायचे टेंडर काढून कुणाचेतरी भरलेले पोट अजून भरते ते पण महत्वाचे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page