top of page

जबाबदारी

Updated: Apr 19

समाजात काही गोष्टी आपण उघडपणे मान्य करत नाही. घरातील जबाबदारी आपण किती चांगल्या प्रकारे हाताळतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सतत चालू असतो. तान्ह्या बाळाचे संगोपन आणि अंथरुणावर खिळून असलेल्या वयस्कर लोकांची सेवा हे जबाबदारीचे दोन प्रकार आहेत. कारण ते घरातील इतर लोकांवर अवलंबून असतात. सर्वांनाच ती जबाबदारी कमी अधिक काळासाठी पार पडावी लागते. त्या नवजात बालकांचे संगोपन जेवढ्या उत्साहाने आणि प्रेमाने केले जाते तेवढी ऊर्जा दिवसेंदिवस आजारी असलेल्या ज्येष्ठांची सेवा सुश्रुषा करण्यात नसते. पहिल्या प्रकारात कर्तव्याचा आनंद असतो, तर दुसऱ्या प्रकारात जबाबदारीचे ओझे वाटते.

コメント

5つ星のうち0と評価されています。
まだ評価がありません

評価を追加
bottom of page