top of page

कला

Updated: Mar 20

कोणतीही कला अवगत नाही याची नेहमी खंत वाटते. घरी एवढ्या पूरक वातावरणात मी मात्र काही आत्मसात करू शकलो नाही. माझ्या आयुष्यात कलेचं अस्तित्व म्हणजे अमावास्येचा चंद्र. नृत्याचा संबंध म्हणजे लहानपणी एकदाच कृष्णाचा अवतार घेऊन मी मध्यभागी बासरी (न वाजवता येणारी) घेऊन फक्त उभा आणि बाकीचे बाजूने नाचत होते. गायनाच्या बाबतीत कर्कश्य गाण्याच्या स्पर्धेत मी कावळ्यालाही हरवू शकतो असा गळा. एखाद्या आवडत्या व्यक्तीचे चित्र काढावं तर जे काही साकार होतं ते व्यंगचित्रासारखं दिसत. साधं अक्षरही मोतीदार नाही, पेन चालत नाही म्हणून झटकल्यवर शाईचे कागदावर शिंतोडे उडल्यावर जे काही तयार होते तसे माझे अक्षर. खेळाच्या बाबतीत आयुष्यच एक मोठा खेळ असल्यामुळे त्याचेच नियम अजून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. इतर काही छोट्या कला अवगत आहेत पण त्यांना कला म्हणायचं का हा वादाचा विषय, जसे की दुसऱ्याची पाककला भरपूर कौतुक करून स्वतःच्या पोटात भरण्याची कला.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page