top of page

म मराठीचा…

Updated: Mar 23, 2025

मराठी भाषा सध्या अस्मितेच्या चितेवर जळत आहेत. आजकाल मोबाईल क्रमांक मराठीत सांगणे कमीपणाचे वाटते. इतर आकडे जरी मराठीत बोलले जात असतील तरी शाळेत शून्य गुण मिळालेला माणूस सुद्धा शून्य न म्हणता आता झीरो म्हणतो. मराठी फक्त राजकारण करण्यापुरती उरली आहे. तुम्ही डाव्या-उजव्या कोणत्याही विचारसरणीचे का असेना दिशा सांगताना मात्र तुम्ही लेफ्ट-राईट या भाषेतच सांगता. मराठी वृत्तवाहिन्या तर इंग्रजी शब्दांचा भडिमार करतात, जसे की ‘ठळक बातम्या’ एवढा चांगला शब्द असताना ‘हेडलाईन्स’ हा शब्द वापरण्याची काय गरज. ‘दुकान की पाटी मराठी मे क्यू नाही लगायी’ असं हिंदी मध्ये बोलून दुकानावर लावलेल्या पाट्या फोडणे हास्यास्पद आहे.


इंग्रजी भाषेच्या घुसखोरी मुळे आपल्या मुलांची निसर्गाशी असलेली अनेक नाती तुटली आहेत. निंबोणीच्या झाडामागे लपलेला चांदो मामा पूर्वी खुश दिसायचा; पण आता तो कुणाचा मामा राहिला नाही आणि ते झाडही राहिले नाही. तो आता Moon झाल्यापासून उदासापणे एखाद्या उंच चकचकीत इमारतीमागे लपलेला असतो. खारू ताईचे पण दुःख याहून निराळे नाही. एवढेच काय तर आम्ही वाघाची मावशी मांजर अस म्हणत प्राण्यांमध्ये पण नाती जोडून दिली आहेत. मनी माऊ म्हटलं की इवलुष्या डोळ्यांनी मंजारकडे कुतूहलाने बघणाऱ्या लहान मुलाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत; पण आता ती Cat झाल्यापासून त्या नावाचा निरागसपणा हरवला. चिऊ काऊ ची गोष्ट सांगताना, काऊ उडत उडत चिऊताईच्या घरी आला हे ऐकून मुलं गोंधळून जातात; कारण मुलांना माहिती असलेला Cow चार पायांचा असतो.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page