top of page

मैत्री

Updated: Mar 23

चेहरा ओळख असणारे खूप लोकं असतात, पण त्याला मैत्री समजणे म्हणजे वेडेपणा. संकोच या शब्दाला मैत्रीमध्ये स्थान नसते. तिथे शब्द, भावना सगळी कशी चौफेर उधळण असते. कामाच्या ठिकाणी होणार त्रास व इतर ताण तणाव सांगून मन मोकळं करायचं पुरुषांचं हक्कच ठिकाण हे घर नसून मित्र असतात. मैत्रीमध्ये संवादाचा स्तर हा कंपाउंड इंटरेस्ट सारखा (माझ्या काही मित्रांना आजकाल फक्त मुत्यूअल फंडची भाषा कळते) वाढत गेला पाहिजे. चहा किंवा इतर पेय प्यायला जमलेल्या मित्रांच्या बैठकींचा मुख्य हेतू हा ते द्रव्य पिणे नसून सुख दुःख व्यक्त करणे हा असतो. मैत्रीमध्ये तुम्ही एकमेकांची कधीच चेष्टा केली नसेल आणि केलेल्या चेष्टेवर मोकळेपणाने कधी हसले नसाल तर तुमच्यात मैत्री नाही हे समजून जा. ज्या लोकांसोबत मैत्री झाली त्यांना सतत भेटणे होतेच असे नाही पण जेव्हा भेट होते ती एक प्रकारे तीर्थयात्रेचं समाधान देते. 

コメント

5つ星のうち0と評価されています。
まだ評価がありません

評価を追加
bottom of page