top of page

साडी

Updated: Mar 20, 2025

लाल, हिरवा, निळा (RGB) एवढे मूळ रंग मला माहिती आहेत. चिंतामणी हे गणपतीचं एक नाव आहे एवढच मला माहिती होतं, पण बायकोबरोबर साडी खरेदीला गेल्यावर कळले की ‘चिंतामणी’ नावाचा रंग आहे. ‘बॉटल ग्रीन’ हा पण एक रंग आहे, पण तो कसा दिसत असावा याचा अंदाज मी माझे मित्र रात्री ‘टेन्शन’ घालवण्यासाठी ज्या बाटल्या घेऊन बसतात त्या बाटलीच्या रंगावरून लावला. काही रंगाच्या नावावरून लहान मुलांच्या कपड्यांसाठी हा रंग असावा असे वाटले, पण जेव्हा एक महिला ‘बेबी पिंक’ या रंगाची साडी दुकानदाराला मागत होती तेव्हा कळाले की रंगाच्या नावाचा आणि वयोगटाचा काही संबंध नाही.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page