top of page

अतिसामान्य नागरिक

Updated: Mar 20

प्रचारसभा, दौरे करण्यात किती व्यस्त आहे हे दाखवण्यासाठी AC गाड्यांमध्ये बसून जेवण करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणारे नेते आणि एकीकडे विजयाचा गुलाल उधळला जात असताना त्याच दिवशी शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्यात आपली गाडी वाहून जाऊ नये म्हणून जीव धोक्यात घालणाऱ्या एका अतिसामान्य नागरिकाचा व्हिडिओ पहिला. आपल्याला जीवनावश्यक गोष्टींमध्ये राजकीय लोकांनी इतके गुंतवून ठेवले आहे कि आपल्या इतर हक्काच्या गोष्टींकडे आपण लक्षही देऊ शकत नाही. जसे एखाद्या भागात पाण्याची समस्या असेल तर नेतेमंडळीं ती समस्या सोडवण्यापेक्षा जोपासण्यावर जास्त भर देतात. कारण जर का पाण्याचो समस्या सोडविली तर तुम्ही लगेच रस्ते, कचरा अशा इतर समस्यांकडे लक्ष द्याल.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page