top of page

संवेदनशील

Updated: Apr 19

कधी कधी वाटत सार्वजनिक जीवनात संवेदनशील असणं शाप आहे. निमूटपणे इतर लोकांसारखं भाकरीमागे पळत राहावं नुसतं, इथे काय चुकीचं तिथे काय असल्या भानगडी कशाला कराव्यात? कशाला धाडस दाखवून प्रश्न विचारावे? हि एवढी मोठी गर्दी धक्के खात सगळं सहन करत आहे ना, मग मीचं काय ठेका घेतलाय? एवढा मोठा निसर्ग त्याची काळजी करणारा मी कोण? पण कसंय ना रस्त्याने वेगाने धावणाऱ्या माझ्या गाडीपुढे अचानक मोठा दगड दिसला आणि तो चुकवून मी पुढे आलो तरी आपण गाडी बाजूला थांबवून तो दगड तिथून काढायला पाहिजे होता म्हणजे बाकी कुणाचा नजरचुकेने अपघात होणार नाही हा विचार म्हणजे संवेदनशीलता. एखादी साधी गोष्ट आपल्या शक्य असूनही आपण ती केली नाही याची खंत सतत मनाला सलत राहते आणि पुन्हा चालू होतो संघर्ष स्वतःचा स्वतःशीच. आपल्याकडे सार्वजनिक हेतूने दोन-चार लोक गोळा होणे अशक्यच; त्याऐवजी सरकार पैसे वाटणार आहे, त्यासाठी फॉर्म भरून द्या म्हंटल कि इतके लोक जमा होतील कि नुसते दोन-चार लोक चेंगराचेंगरीत मरतील.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page