top of page

हेलपाटे

Updated: Mar 23

हेलपाटे हा शब्द ऐकला मी मला सरकारी कार्यालयाची आठवण येते. ज्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना कमीत कमी माहीत मिळण्याची जास्त गैरसोय केलेली असते ते ठिकाण म्हणजे सरकारी कार्यालय. इथे एखाद्या कामासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची यादी एकाच वेळी न सांगता आपल्याला उंबरठे झिजवायला भाग पाडले जाते. जरी आजकाल सगळी कार्यालये ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रयत्न चालू असला तरी अधिकाऱ्यांच्या ऑफिस बाहेरची ‘लाईन’ काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण प्रशासनाच्या दारी जनतेच्या कष्टाच्या घामाने वाहणाऱ्या पैशाच्या नदीवर जर ऑनलाईन कारभाराचा बांध घातला तर भ्रष्टाचाराचा महासागर भरणार कसा. या व्यवस्थेचा राजा हा संबंधित अधिकारी नसून तिथे असणारा शिपाई हा खरा राजा आहे हे जेवढे लवकर तुम्हाला समजेल तेवढे लवकर तुमचे काम होईल.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page