top of page

स्वभाव

Updated: Mar 20, 2025

माणसाला एक वेळ कमी अक्कल असेल, डोकं कमी चालत असेल तरी ठीक पण स्वभाव विसराळू असू नये. काही लोक वक्तशीर असतात, काही हुशार असतात, पण माझ्या बाबतीत विसरळूपणा हाच माझा स्वभाव गुण सांगण्यासारखा आहे. विचारांची मालिका डोक्यात सुरू झाली की बऱ्याचश्या गोष्टी विसरून जातो. कधीकधी गाडी चालवताना बुद्धीला जिकडे जायचं असतं तिकडे मनाचं लक्ष नसल्याने रस्ता भरकटलो आहे हे बरेच अंतर पुढे गेल्यावर लक्षात येते. लोकांचे नाव, ऑफिस मधील कामे अशा इतर गोष्टींचं ठीक आहे पण घरी विकत आणायला सांगितलेल्या वस्तू, लग्नाची तारीख अशा गोष्टी लक्षात न राहिल्याने भांडणात हे विषय निघाले कि माघार घ्यावी लागते. मग मी स्मरणशक्ती वाढावी म्हणून बदाम खायचे ठरवले, पण बऱ्याचदा भिजवलेले बदाम खायला विसरल्याने त्यालाच भांडणाचे नवे कोंब फुटले. 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page