top of page

ठळक बातम्या

Updated: Mar 23

बऱ्याच दिवसानंतर बातम्या बघण्यासाठी टिव्ही चालू केला. पण आपण काय पाहतो आहे त्यावर माझा विश्वासाचं बसत नव्हता. एकही नेता वैयक्तिक टीका न करता आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रश्नावर बोलत होते. मंत्री त्यांच्याकडील खात्याबद्दल बोलत होते. काहीतरी चुकतंय असं वाटून मी चॅनल बदलला तर दुसऱ्या चॅनलवर विरोधी पक्षातील नेते फक्त उर बडवत न बसता चांगल्या कामाचं समर्थन आणि वाईट कामाला कडाडून विरोध (शब्दांची मर्यादा बाळगून) करत होते. तिसऱ्या चॅनेलवर निसर्ग प्रेमी असलेल्या पर्यावरण मंत्र्याच्या तोंडी चक्क प्रदूषण नियंत्रण अन् झाडे असले शब्द ऐकून मला हृदयविकाराचा झटका येतो की काय असं झालं. सगळंच छान सुंदर सुरू होतं. रामराज्य की काय म्हणतात ते ह्यालाच का असा प्रश्न माझ्या मनात आला. आणि अचानक काहीतरी होतंय असं वाटलं आणि बघितलं तर बायको मला झोपेतून उठवत म्हणाली काय झोपेत बडबड करताय? वेडबिड लागलंय का?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page