top of page

वपुर्झा- व.पु. काळे Vapurza Va Pu Kale

Updated: Oct 4, 2025

हे पुस्तक पारंपरिक कथासंग्रह किंवा कादंबरी नाही, तर व.पु. काळे यांच्या विविध पुस्तकांमधील निवडक उतारे, विचार आणि तत्त्वज्ञानाचा संग्रह आहे. यात कुठलीही निश्चित कथा किंवा क्रम नाही; त्याऐवजी, लेखकाच्या जीवनविषयक निरीक्षणांचे आणि अनुभवांचे सुंदर चित्रण आहे.

हे एकमेव असे पुस्तक असेल कि ज्यामध्ये  कोणतेही पान उघडून वाचायला सुरु करू शकता. आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे म्हणजे हे पुस्तक इंस्टाग्रामवरील रिल्ससारखे आहे.  काही सेकंदाचे रिल्स जसे आपल्याला खिळवून ठेवतात तसेच ह्या पुस्तकातील छोटे-छोटे परिच्छेद आहेत. ज्यांना वाचनाची आवड नसेल आणि एका जागी बसून पुस्तक वाचणे जमत नाही अश्या लोकांनी ह्या पुस्तकापासून सुरुवात करावी.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाचकाला स्वातंत्र्य देते - क्रमाने वाचण्याची सक्ती नाही, संदर्भांची गरज नाही आणि कुठलाही शेवट गाठण्याची घाई नाही. हे पुस्तक म्हणजे एक रिकामे पात्र आहे, जे वाचकाच्या मनातील विचार आणि भावनांनी भरले जाऊ शकते. मराठी साहित्यप्रेमींसाठी "वपुर्झा" हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे, जे प्रत्येक वाचनात नवीन अर्थ उलगडते.


Vapurza Va Pu Kale

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page