top of page

Word Happiness Day

Updated: Apr 19

Happiness म्हणजे आनंद. आपण आनंदाचा थेट संबंध पैश्यांशी जोडतो. जगण्यासाठी पैसा लागतो हे खरं आहे. पैशाने आनंद मिळत असला तरी तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. कारण आनंद हा मर्यादित काळापुरता असतो. समाधानाचा संबंध भौतिक वास्तूंशी नसतो. त्यामुळे माणसाने आनंदी राहण्यापेक्षा समाधानी असावं. समाधानी असणं आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जसे तुम्ही गाडी घेता त्यावेळी तुमचा उद्देश स्वतःची प्रतिष्ठा जपणे हा असेल तर त्याला अमाप पैसा असला तरी कमी पडतो, आणि एवढं करून गाडी घेतलीच तर दुसऱ्या कोणाच्या गाडीचे फीचर्स बघून आपल्या गाडीचा आनंद कमी होतो. पण त्याऐवजी गाडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा उद्देश असेल तर तो पूर्ण झाल्याच समाधान मिळते, इथे तुलना करायला स्थान राहत नाही.

छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो, रोज एका वेळेच तरी जेवण कुटुंबासोबत करता येणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. पण हे तुमच्या नशिबात असेल तर ते पण एक प्रकारच सुखच आहे. त्यासाठी जेवणात पंचपक्वान्न असावेच लागते असे नाही.

त्यामुळे आनंद हा आपण कोणत्या गोष्टींवर समाधानी आहोत यावर अवलंबून आहे.

Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
bottom of page